मुंबई : उंदरांचा उपद्रव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी गोंदपट्टीचा (ग्लू ट्रॅप) सर्रास वापर केला जातो. उंदीर नियंत्रणाच्या या गोंद सापळ्यामुळे उंदरांबरोबरच इतर प्राण्यांनाही त्याचा त्रास होत असल्याने महाराष्ट्र पशुसंवर्धन आयुक्तालयाने चिकट गोंदपट्टीच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर राज्यात मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> अनंत चतुर्दशी दिवशी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त; विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर




पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा) इंडियाने गोंदपट्टीच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली होती. गोंदपट्टीच्या वापरामुळे उंदरांव्यतिरिक्त पक्षी, सरडे, खार यांसारखे प्राणीसुद्धा या सापळ्यात अडकतात आणि त्यांचा मृत्यू होतो. तसेच उंदीर या गोंद सापळ्यात अडकतात तेव्हा त्या सापळ्यासह ते कचऱ्यात फेकले जातात. परंतु लगेच त्यांचा मृत्यू होत नाही. काही दिवस ते जिवंत असतात आणि उपासमार झाल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. ही पद्धत क्रूर असल्याचा मुद्दा पेटा इंडियाने मांडला होता. गोंदपट्टी कचऱ्यात किंवा रस्त्यावर टाकण्यात येते. त्यावर पक्षी, साप, बेडूक चिकटून या प्राण्यांचे जीव धोक्यात येतात.
हेही वाचा >>> काकू भडकल्या ना राव! तरुणीच्या थेट कानशिलात लगावली, मुंबई लोकलमधला व्हिडीओ व्हायरल
या पार्श्वभूमीवर पेटाने महाराष्ट्र पशुसंवर्धन आयुक्तालयाकडे चिकट गोंदचे उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली होती. आंध्र प्रदेश, अरूणाचल प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, लक्षद्वीप, लडाख, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही गोंदपट्टींचा वापर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कचरापेटी स्वच्छ ठेवावी, कचरापेटी बंद ठेवावी तसेच अमोनियाने भिजवलेले कापूस वापरावे. उंदीर बाहेर पडू नये यासाठी ती बंद करावीत, असे आवाहन पेटाने केले आहे.