मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईतील चाकरमान्यांची नि:स्वार्थपणे सेवा करणाऱ्या डबेवाल्यांनाही हक्काचे घर देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शहरातील डबेवाले कामगारांना घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. आपल्या विविध मागण्यांबाबत डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या वेळी आमदार श्रीकांत भारतीय, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईतील डबेवाले चाकरमान्यांची नि:स्वार्थपणे सेवा करीत आहेत. मुंबई हेच त्यांचे कार्यक्षेत्र असल्याने मुंबई व नजीकच्या परिसरात त्यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यावर डबेवाल्यांना घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच प्रधान मंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यस्तरीय योजना करण्यासंदर्भातही अभ्यास करण्यात येईल. यामुळे यांसारख्या अन्य इतर घटकांनाही लाभ मिळू शकेल. शहरे विकसित करताना प्रकल्पांच्या उभारणीत गृहनिर्माणाचा साकल्याने विचार करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले