मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार लढवल्या जातात. त्यामुळे काही ठिकाणी या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा किं वा काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यास  सरकारमधील प्रत्येक पक्ष मोकळा आहे, असे अल्पसंख्याक विकासमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट के ले. तसेच किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिके ल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त के ला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची पक्षाची तयारी असल्याचे सुतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी के ले. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

तर सरकार ५ वर्षे टिकण्यासाठी व मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला शुभेच्छा असा टोला लगावत हे सरकार टिकले तर मुख्यमंत्रिपदासाठी वाटा की घाटा असा प्रश्न निर्माण होईल, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी के ली.