गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह सोमवारी निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगापुढे हजर झाले. चौकशी आयोगाने यावेळी परमबीर सिंह यांच्याविरोधात जारी केलेला जामीनपात्र वॉरंट रद्द केला तसंच १५ हजार रुपये दंड ठोठावला. दरम्यान यावेळी परमबीर सिंह आणि सचिन वाझे आमने-सामने आले होते. सुमारे तासभर दोघे एकत्र गप्पा मारत होते. या भेटीवरुन चर्चा रंगली असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सचिन वाझे-परमबीर सिंह भेट ; अनिल देशमुख यांच्या वकीलांची नाराजी

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
sharad pawar, madha lok sabha constituency, ncp, bjp
माढ्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री

दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीसंबंधी चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, “हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली याची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांना सांगण्यात आलं आहे”.

चांदीवाल आयोगासमोर हजर होण्यासाठी गेलेल्या परमबीर सिंग यांच्यासमोर आले सचिन वाझे; अन् त्यानंतर…

पोलिसांवर दबाव आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “तसा काही प्रश्न उद्भवत नाही. दबाव असण्याचं कारण नाही. त्यांनी सुप्रीम कोर्टातून संरक्षण घेतलं असल्याने ज्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत तिथे जबाब देत आहेत”. राज्य सरकार सीबीआयला सहकार्य करत असल्याचं सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावले. परमबीर सिंह यांच्या निलंबनाची कारवाई सुरु असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

दरम्यान परमबीर सिंह यांनी पदभार स्विकारला आहे का? असं विचारण्यात आलं असता दिलीप वळसे पाटील यांना नकार देत त्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत संपर्क साधला नसल्याची माहिती दिली. तसंच परमबीर सिंह सेवेत नसताना त्यांनी सरकारी वाहनाचा वापर करणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान वाझे-सिंह भेटीबद्दल साहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशी केली. एक उपनिरीक्षक व तीन शिपायांचे जबाब नोंदवल्यानंतर त्याची कागदपत्रे नवी मुंबई पोलिसांना सुपूर्द करण्यात आली. वाझेंसोबत आलेले पोलीस नवी मुंबई पोलीस दलाला संलग्न असल्यामुळे ही कागदपत्रे पुढील कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. हरी बालाजी यांनी सांगितले. या प्रकरणाची गृह विभागाकडून माहिती घेण्यात आली.

अनिल देशमुखांच्या वकिलाची नाराजी

अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आपली नाराजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यासमोर व्यक्त केली. आयोगाने सचिन वाझेंना आयोगासमोर हजर करण्याचे आदेश दिले आणि ताकीद दिली. आमच्याकरता सर्व अधिकारी समान आहेत. यापेक्षा तुम्ही बाहेर थांबा पण कोणाला भेटू नका, कोणाशी बोलू नका. बोलायचे असल्यास, भेटायचे असल्यास कायदेशीर परवानगी घ्या’’ असे सांगून आयोगाने नाराजी व्यक्त केली.

याचदरम्यान परमबीर सिंह यांनी आयोगाला एक प्रतिज्ञापत्र दिले. त्यात त्यांनी ‘‘आपल्याकडे अजून काहीही पुरावे नाहीत, जे काय आहे ते मी याआधीच यंत्रणांना दिले आहेत,” असं सांगितलं.

ठाणे कोपरी पोलीस ठाण्यासंदर्भात चौकशीसाठी मंगळवारी परमबीर सिंग हजर होणार आहेत. आयोगापुढे हजर होण्यापूर्वी सकाळी सिंह गृहरक्षक दलाच्या कार्यालयात गेले होते. पण त्यांनी पदभार स्वीकारला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाच तास चौकशी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिह यांची सीआयडी कार्यालयात सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. सिह यांची चौकशी अजून किमान ४ दिवस चालणार आहे. चौकशीसाठी नवी मुंबईतील कोकण भवन इमारतीतील सीआय डी कार्यालयात दुपारी तीनच्या सुमाराला ते हजर झाले होते.