मुंबई: राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात फेरबदल करताना संजीव कुमार यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.तर विक्रम कुमार यांची महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पी.वेलारासू यांची गेल्याच आठवड्यात एमआयडीसी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून वन विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. मात्र वनविभागातील भारतीय वन सेवेतील अनेक अधिकार सेवेत वरिष्ठ असल्याने या अधिकाऱ्यांनी वेलारासू यांना सचिव म्हणून रिपोर्ट करण्यास नकार दिल्याने वेलारासू यांची नियुक्ती आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील(IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या पाठोपाठ आता भारतीय वन सेवेतील(IFS) अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्या आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ येथे तर नरेश झुरमुरे (१९९६) यांची बदली प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी करण्यात आली आहे. पी. कल्याणकुमार (१९९७) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) नागपूर,
डॉ. रविकिरण गोवेकर (२००१) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) मुंबई यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), (पश्चिम), मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

तसेच चंद्रशेखर बाळा एन. वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती,श्रीमती टी ब्युला एलिल मती महाव्यवस्थापक (औषधी वनस्पती) महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्या. नागपूर, राहुल पाटील यांची उप वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन), वन्यजीवनागपूर, विनोद शिवकुमार उप वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), कुशाग्र पाठक प्रादेशिक व्यवस्थापक एफ डी सी एम लि. नागपूर, विजय माने, उप वनसंरक्षक (कार्य आयोजना) चंद्रपूर, महादेव मोहिते उप वनसंरक्षक पुणे, उमेश वावरे उप वनसंरक्षक अलिबाग, किर्ती दादासाहेब जमदाडे.
उप वनसंरक्षक (कार्य आयोजना) अमरावती येथे नियुक्ती करण्यात आली आहे.