राज्यात ५५ हजार रोजगार निर्माण होतील: मुख्यमंत्री

मुंबई : दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत अवघ्या दोन दिवसांत महाराष्ट्राशी तब्बल ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. विदेशी गुंतवणूकदारांची भारतातील पहिली पसंती महाराष्ट्रालाच असल्याचे या करारांवरून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. या गुंतवणुकीमुळे राज्यात ५५ हजार रोजगार निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जगभरातील गुंतवणूकदार, उद्योगपती, राज्यकर्ते, धोरणकर्ते, अर्थतज्ज्ञ यांचा वार्षिक मेळा असलेल्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतील महाराष्ट्राच्या दालनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक देशांतील कंपन्या, गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. दावोस परिषदेतून राज्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी परिषदेला निघण्यापूर्वी व्यक्त केला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक उद्योगांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
expensive mandap in pm modi rally in yavatmal
मोदींच्या कार्यक्रमासाठी १३ कोटींचा सभामंडप! निविदा प्रक्रिया न राबविताच कामाला मंजुरी
electricity
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…
Pm modi meeting at Yavatmal
यवतमाळ : पंतप्रधानांची सभा, रस्ते बंद, विद्यार्थ्यांची गैरसोय…

दरम्यान, जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी बैठक झाली. जपान बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात पुण्याजवळील सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्क या ठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि दळणवळण सुविधा देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टीमवरदेखील चर्चा झाली.

महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण करार
पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चून ‘रूखी फूड्स’चा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार. त्यामुळे राज्याच्या अन्नप्रक्रिया क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता.

औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ‘ग्रीनको’ नवीनीकरण ऊर्जेचा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प उभारणार. या प्रकल्पामुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळणार.

महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ‘बर्कशायर- हाथवे’ या उद्योगाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार.
मुंबईत ‘इंडस् कॅपिटल पार्टनर्स’ यांच्या १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पातून आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाच्या सेवा उपलब्ध होणार.

अमेरिकेच्या ‘न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन’चा चंद्रपूरमधील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसिफिकेशन प्रकल्प (रोजगार १५ हजार)
बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार.

जपानच्या ‘निप्रो कार्पोरेशन’ या उद्योगाचा १ हजार ६५० कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्लास टय़ुिबग प्रकल्प पुण्याजवळ उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषधनिर्मिती क्षेत्रास चालना मिळणार. २ हजार रोजगारनिर्मितीची शक्यता.

ब्रिटनच्या वरद फेरो अलॉईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार २ हजार)

इस्रायलच्या राजुरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प (रोजगार १ हजार)

पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अँटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टिक ऑटोमोटिव्हज् प्रकल्प (रोजगार २ हजार)

गोगोरो इंजिनीयिरग व बडवे इंजिनीयिरगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प