मुंबई : विधान परिषद निवडणुकीत सचिन अहिर व आमश्या पडवी हे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले खरे पण पक्षाचे ५५ आमदार असताना या दोघांना पहिल्या पसंतीची ५२ मते मिळाल्याने शिवसेनेची तीन मते फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही सिंह निवडून आले पण गडाला मात्र खिंडार पडले अशी अवस्था झाली. याशिवाय सेनेच्या सहयोगी आमदारांच्या मतांचे काय असा प्रश्नही निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर विधान परिषदेच्या गुप्त मतदानात काय होणार याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत होते. निवडून येण्यासाठी आवश्यक पहिल्या पसंतीची २६ मते मिळाल्याने सचिन अहिर व आमश्या पडवी हे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून आले.  मात्र शिवसेनेची मते फुटल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झटका बसला आहे. गेल्या अडीच वर्षांत संवाद-संपर्काअभावी शिवसेना आमदारांमध्ये पक्ष नेतृत्वाविषयी निर्माण झालेल्या नाराजीचाच हा परिणाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.  शिवसेनेचे ५६ आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेकडे विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या ५५ आमदारांची मते होती. याशिवाय राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांचा पक्षाचा एक आमदार, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर असे थेट शिवसेनेच्या कोटय़ातील सत्तेचे लाभार्थी असलेले आणखी चार आमदार होते. असे शिवसेनेकडे ५९ आमदार थेट होते.

Eknath Shinde, narendra Modi, narendra Modi pm till 2034, Opposition, Spreading Misleading Propaganda, ekanth shinde praises narendra modi, ekanth shinde criticses maha vikas agahdi, washim lok sabha seat, lok sabha 2024,
“मोदी २०३४ पर्यंत पंतप्रधान राहतील,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; म्हणाले, “विरोधकांना जनताच…”
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
bhavana gawali
“भावना गवळी यांना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामे देणार,” शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा
AAP leader Kailash Gahlot
‘आप’ पक्षाला आणखी एक धक्का? मद्य धोरण प्रकरणात आणखी एक मंत्री ईडीसमोर हजर

तर आणखी काही अपक्ष सोबत असल्याचा दावा होता. सचिन अहिर व आमश्या पडवी यांना केवळ शिवसेनेची मोजली तरी पहिल्या पसंतीची ५५ मते मिळणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात या दोघांना मिळून ५२ मते मिळाली. एकप्रकारे दोन्ही आमदार काठावर निवडून आले. यामुळे शिवसेनेची तीन मते फुटल्याचे स्पष्ट झाले असून सहयोगी आमदारांच्या मतांचे काय, पाठिंबा देणारे अपक्ष किती व त्यांची मते कुठे गेली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत दगाफटक्यामुळे हंडोरे पराभूत

विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे दलित समाजातील नेते काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार असताना पक्षांतर्गत दगाफटक्यामुळे हंडोरे यांचा पराभव झाला ही दुर्दैवी घटना असल्याची टीका  काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे. पहिल्या क्रमांकाचे उमेदवार असतानाही दलित समाजातील हंडोरे यांना  दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारापेक्षा कमी मते मिळून पराभूत व्हावे लागले. मला हंडोरे यांच्याविषयी सहानुभूती वाटते, असे निरुपम यांनी म्हटले आहे.