मुंबई : राज्यामध्ये वैद्यकीय (एमबीबीएस) व दंत (बीडीएस) अभ्यासक्रमाच्या अनुक्रमे सहा फेऱ्यांनंतर दोन्ही अभ्यासक्रमाच्या १३८ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ८४, तर दंत अभ्यासक्रमाच्या ५४ जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागांमध्ये शासकीय महाविद्यालयांच्या तुलनेत खासगी महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक आहे.

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ८८१४ जागा आहेत. यापैकी ८७३० जागांवर प्रवेश झाले. तर ८४ जागा रिक्त राहिल्याने प्रवेशाचे प्रमाण ९९.०४ टक्के इतके आहे. यामध्ये ४३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ५,०६५ जागा असून, या सर्व जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १०० टक्के प्रवेश झाले. २५ खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ३,२९९ जागांपैकी ३,२६० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ३९ जागा रिक्त राहिल्या. राज्यामध्ये यंदा नव्याने मान्यता मिळालेल्या २ खासगी वैद्यकीय विद्यापीठात एमबीबीएसच्या ४५० जागा आहेत. यापैकी ४०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ४५ जागा रिक्त आहेत.

राज्यात दंत अभ्यासक्रमाच्या २,६१७ जागा आहेत. यापैकी २,५६३ जागांवर प्रवेश झाले असून, ५४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेशाचे प्रमाण ९७.९३ टक्के आहे. राज्यातील ५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ३१७ जागांपैकी ३१५ जागांवर प्रवेश झाले असून, २ जागा रिक्त राहिल्या. तर २३ खासगी महाविद्यालयातील २,२०० जागांपैकी २,१७८ जागांवर प्रवेश झाले. २२ जागा रिक्त राहिल्या. राज्यात यंदा नव्याने मान्यता मिळालेल्या एका खासगी दंत विद्यापीठातील १०० पैकी ७० जागांवर प्रवेश झाले असून, ३० जागा रिक्त राहिल्या.

मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार २०२५-२६ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या ८,५३७ जागांवर प्रवेश झाले. दंत अभ्यासक्रमाच्या उपलब्ध २,७१८ जागांपैकी फक्त एक जागा रिक्त राहिली. २०२४-२५ मध्ये वैद्यकीयच्या ८,१४३ जागांपैकी एकही जागा रिक्त नव्हती, तर बीडीएससाठीच्या २,६७५ पैकी फक्त एक जागा रिक्त होती. २०२३-२४ मध्ये वैद्यकीयच्या ७,२८५ पैकी शून्य जागा आणि दंतच्या २,६७५ पैकी ११ जागा रिक्त होत्या. यापूर्वी वैद्यकीय व दंत पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थास्तरावर होणारे प्रवेश यंदा सीईटीमार्फत करण्यात आले. यामुळे खासगी महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराला यंदा चाप बसला. तसेच वैद्यकीय व दंत प्रवेशासंदर्भातील कोणतीही तक्रार विद्यार्थी व पालकांकडून आली नाही.

मागील चार वर्षांत एमबीबीएसमध्ये झालेले प्रवेश अ क्र –

शैक्षणिक वर्ष

  • उपलब्ध जागा
  • झालेले प्रवेश

रिक्त जागा १

२०२६-२७

  • ८८१४
  • ८७३०
  • ८४२

२०२५-२६

  • ८५३७
  • ८५३७
  • ०० ३

२०२४-२५

  • ८१४३
  • ८१४३
  • ०० ४

२०२३ -२४

  • ७३२५
  • ७३२५
  • ००

मागील चार वर्षांत बीडीएसमध्ये झालेले प्रवेश अ क्र

शैक्षणिक वर्ष

  • उपलब्ध जागा
  • झालेले प्रवेश

रिक्त जागा १

२०२६-२७

  • २६१७
  • २५६३
  • ५४२

२०२५-२६

  • २६१८
  • २६१७
  • ०१३

२०२४-२५

  • २६७५
  • २६७४
  • ०१ ४

२०२३ -२४

  • २६७५
  • २६६४
  • ११