मंत्री अस्लम शेख ड्रग पेडलर काशिफ खानला त्यांच्या पार्टीमध्ये बोलवायचे, असा आरोप भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलाय. काशिफ खान हे फॅशन टीव्ही इंडियाचे एमडी आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी काशिफ खानचे नाव समोर आले आहे. आज याआधी मंत्री नवाब मलिक यांनी काशिफ खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने का अटक केली नाही, असा सवाल केला होता.

“काशिफ खानने आमचे मंत्री अस्लम शेख यांच्यावर पार्टीत येण्यास दबाव टाकला होता. तसेच तो आमच्या सरकारमधील विविध मंत्र्यांच्या मुलांना पार्टीत बोलावण्याचा विचार करत होता. अस्लम शेख तिथे गेले असते तर उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र झाला असता,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. तसेच आर्यन खानचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा हा सगळा डाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. शिवाय या अपहरण नाट्याचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज असल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Mahua Moitra
उमेदवारी जाहीर होताच महुआ मोईत्राना झटका; ईडीकडून मनी लाँडरिंगचा खटला दाखल
Himanta Biswa Sarma slams rahul gandhi
‘राहुल गांधी आईचं ऐकत नाही आणि सोनिया गांधीही त्यांना घाबरतात’, हिमंता बिस्वा सरमांचा आरोप
Sharmistha Mukharjee and Arvind Kejriwal arrest
“कर्माची फळं…”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचा केजरीवालांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “अण्णा हजारे गँग…”

नवाब मलिकांचे आरोप..

आर्यन खानला क्रूजवर बोलावण्यात आलं…

आर्यन खानला २ ऑक्टोबरच्या दिवशी क्रूजवर बोलावण्यात आलं होतं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. “प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रूजवर गेला. मोहीत कंबोज यांच्या साल्याच्या माध्यमातून हे जाळं टाकण्यात आलं. तिथे आर्यन खानला पोहोचवलं गेलं. आर्यन खानचं अपहरण करून २५ कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील १८ कोटींमध्ये झाली. ५० लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला”, असं नवाब मलिक म्हणाले आहे. 

मोहीत कंबोज आणि समीर वानखेडे मित्र

दरम्यान, भाजपाचे नेते मोहीत कंबोज आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे मित्र असल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला. “अपहणाराचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज आहे. खंडणीच्या खेळात मोहीत कंबोज वानखेडेचे सहकारी आहेत. मोहीत कंबोज आणि वानखेडेचे चांगले संबंध आहेत. स्मशानभूमीत आपला कुणीतरी पाठिंबा करतंय असा दावा वानखेडेंनी केला. ७ तारखेला मोहीत कंबोज आणि वानखेडे स्मशानभूमीच्या बाहेर भेटले. तिथल्या रहिवाशांनी सांगितलं की एक गाडी आली, त्यात बॉडिगार्ड होते. एक दाढीवाला त्यांना भेटला”, असा दावा नवाब मलिक यांनी केला.