मुंबई : राज्यातील १२ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी गृह विभागाकडून देण्यात आले. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे दक्षता अधिकारी दिगंबर प्रधान यांची मुंबई उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील उपायुक्त प्रकाश जाधव यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय), महाराष्ट्र राज्य या पदावर बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबई: दोन कोटींची लाच मागितल्याप्रकरणी महापालिका अधिकाऱ्याविरोधात गुन्हा; दोन व्यक्तींना अटक, एसीबीची कारवाई

ठाण्यातील उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांची पोलीस अधिक्षक छत्रपती संभाजीनंगर (ग्रामीण) या पदावर बदली करण्यात आली आहे. याशिवाय महामार्ग विभागात कार्यरत मोहन दहिकर यांचीही ठाणे पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. एकूण १२ उपायुक्तांच्या बदलीचे आदेश गृहविभाकडून देण्यात आले आहेत. यापूर्वी मंगळवारी १६ उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.