मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी घेतला असून भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील तब्बल २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

जालना पोलीस अधिक्षक अजय बन्सल यांच्याकडे सायबर सुरक्षा अधिक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधिक्षक सिंगुरी विशाल आनंद यांची धुळे पोलीस अधिक्षकपदी, नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक बाबासाहेब पाटील यांची मुंबईत उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची पोलिस महासंचालक कार्यालयत तर रविंद्रसिंह परदेशी यांची राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. संदीप घुगे यांची मुंबईत उपायुक्तपदी, श्रवण दत्त यांची अप्पर पोलीस महासंचालक(विशेष कृती), मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर पोलीस अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षकपदी धोंंडोपंत स्वामी, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्य अधिक्षकपदी अनुज तारे यांची तर अनुराग जैन यांची मुंबईत उपायुक्तपदी, नंदूरबार पोलीस अधिक्षकपदी अश्विनी सानप यांची बदली करण्यात आली आहे. तसेच जालना पोलीस अधिक्षकपदी तेगबीर सिंह संधु, पुणे लोहमार्ग पोलीस अधिक्षकपदी राजकुमार शिंदे, वाशिम पोलीस अधिक्षकपदी निकेश खाटमोडे, चंद्रपूर पोलीस अधिक्षकपदीआयुष नोपानी, परभणी जिल्हा पोलीस अधिक्षकपदी पंकज कुमावत, अमरावती ग्रामीण पोलीस अधिक्षकपदी निकेतम कदम, मालेगाव अप्पर पोलीस अधिक्षकपदी सुरज गुंजाळ, गजानन राजमाने यांची मुंबईत उपायुक्तपदी आणि दत्ता तोटेवाड यांची अमरावती अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.