Eknath Shinde Maharashtra Government: पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना लगावला आहे. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही महत्वाची भूमिका घेतली असं वाटत नसल्याचंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जास्तीत जास्त सत्ता जाईल,” संजय राऊत स्पष्टच बोलले, एकनाथ शिंदेंसोबत फोनवरुन केली चर्चा

छगन भुजबळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊतांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्वीट करत सरकार पडण्याचे संकेत दिले आहेत. भुजबळांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आपण अद्याप हे ट्वीट पाहिलं नसल्याचं म्हटलं.

Eknath Shinde Live Updates : लवकरच विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता, संजय राऊत यांनी दिले संकेत

“मी अद्याप संजय राऊतांचं ते ट्वीट पाहिलेलं नाही. आता शरद पवार यांना भेटण्यासाठी जात आहोत. काही मार्ग निघतो का यावर चर्चा करु. शरद पवार याकडे लक्ष देतील,” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री महत्वाची भूमिका घेतील का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मला तरी वाटत नाही. ही नेहमीप्रमाणे होणारी बैठक आहे”.

एकनाथ शिंदेंनी खासगीत आणि माध्यमांसमोर वेगळं बोलतात असा आरोप केल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

असं काही होत असल्याचं माझ्या कानावर आलं नव्हतं. शिवसेनेच्या अंतर्गत मुद्द्यावर मी काय बोलणार असं सांगत भुजबळांनी जास्त बोलणं टाळलं. “सरकारमध्ये राहणं, पडणं, राजीनामा देणं या सगळ्या गोष्टी आम्हाला, शरद पवारांना काही नवीन नाही. मध्यावधी लागू होऊ दे अथवा काहीही राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे,” असा सल्ला यावेळी भुजबळांनी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis ncp chhagan bhujbal eknath shinde pm narendra modi debhu mahavikas aghadi sgy
First published on: 22-06-2022 at 12:35 IST