scorecardresearch

राज्यात ५२ तर, मुंबईत १८ नवे रुग्ण ; दोन वर्षांनंतर रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबईतील  रुग्णसंख्येमध्ये वेगाने घट होत असून दोनवर्षांत प्रथमच १८ रुग्ण आढळल.

मुंबई: राज्यात करोनाच्या ५२ रुग्णांचे सोमवारी नव्याने निदान झाले आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच राज्यातील रुग्णसंख्या इतक्या खाली गेली आहे. मुंबईत सोमवारी १८ रुग्ण नव्याने आढळले असून करोनाची पहिल्या लाटेनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या २० च्या खाली गेली आहे.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत असून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दोन वर्षांनंतर प्रथमच ५० पर्यत कमी झाली आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या कमी झाली तरी इतकी मोठी घट कधीच झालेली नव्हती.

मुंबईतील  रुग्णसंख्येमध्ये वेगाने घट होत असून दोनवर्षांत प्रथमच १८ रुग्ण आढळल. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्याही घटली असून सध्या १४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. सोमवारी ५० रुग्ण करोनामुक्त झाले, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या अडीचशेपर्यत घटली आहे.  राज्यात सोमवारी १०७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  सध्या राज्यात ८६६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

ठाणे जिल्ह्यात सहा बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी सहा करोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात शून्य मृत्यूनोंद झाली. सहा रुग्णांपैकी ठाणे तीन, नवी मुंबई दोन आणि कल्याण – डोंबिवली पालिका क्षेत्रात एक रुग्ण आढळला. तर मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी पालिका क्षेत्रांसह ग्रामीण क्षेत्रात नव्याने एकही करोनाबाधितांची नोंद करण्यात आली नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra records 52 covid 19 cases mumbai recorded 18 fresh cases zws

ताज्या बातम्या