विक्रीची खोटी बिले देवून २०६० हवाला व्यापाऱ्यांनी सुमारे १६०० कोटी रुपयांचा विक्रीकर चुकविण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून या व्यापाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रामनाथ मोते आदींनी हवाला व्यापाऱ्यांनी केलेल्या करोडो रुपयांच्या करचुकवेगिरीचा मुद्दा उपस्थित केला होता. शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली असताना कोणती पावले टाकली जात आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. विक्रीची खोटी बिले देवून विक्रीकराची वजावट घेण्यात आली असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यांना हवाला व्यापारी म्हणून घोषित करण्यात आले असून १८९५ व्यापाऱ्यांचे नोंदणी दाखले रद्द करण्यात आले आहेत, तर १६५ व्यापाऱ्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अन्य कायदेशीर कारवाई सुरु असल्याचेही पवार यांनी सांगितले. हवाला व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या टीन क्रमांकाबाबत विक्रीकर विभागाचे संबंधित अधिकारी दोषी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2013 रोजी प्रकाशित
राज्यातील व्यापाऱ्यांनी १६०० कोटी रुपयांचा विक्रीकर चुकविला
विक्रीची खोटी बिले देवून २०६० हवाला व्यापाऱ्यांनी सुमारे १६०० कोटी रुपयांचा विक्रीकर चुकविण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून या व्यापाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली.
First published on: 27-03-2013 at 02:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state businessman paid 1600 cr as tax