scorecardresearch

राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘कासव’ सर्वोत्कृष्ट

सायरा बानो, विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सायरा बानो, विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार

सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे देण्यात  येणारा राजकपूर पुरस्कार आणि चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार तसेच ५४ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी वांद्रे रेक्लमेशन, म्हाडा मदान क्र.१ येथे रंगला. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना राजकपूर जीवनगौरव पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी व व्ही.एन.मयेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. िहदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते जॅकी श्रॉफ यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री राखी व किरण शांताराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  ५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सहात कासव हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला .

सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानाचा मान दशक्रिया या चित्रपटाने तर तिसऱ्या स्थानाचा मान व्हेंटिलेटर या  चित्रपटाला मिळाला. तर एक अलबेला या चित्रपटासाठी अभिनेता मंगेश देसाई याला उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार तर कासव चित्रपटासाठी इरावती हर्षे हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी  विशेष प्रकल्प : विनोद तावडे

मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी राज्य शासन विशेष प्रकल्प हाती घेईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या सोहळय़ात सांगितले. मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताच्या आधी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत ५५ सेकंदांची चित्रफीत दाखविण्यात यईल, असे तावडे यांनी नमूद केले. या चित्रफितीचे अनावरण या सोळय़ात करण्यात आले. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर,आमदार आशीष शेलार, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, राखी, किरण शांताराम, व्ही. एन. मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra state film awards kaasav movie

ताज्या बातम्या