मुंबई : पर्यावरणस्नेही, व्यायामासाठी उत्कृष्ट पर्याय, त्याचप्रमाणे कोणत्याही ठिकाणी सहज पोहोचणे शक्य असल्यामुळे विविध देशांमध्ये अनेक जण सायकलचा वापर करतात. अनेक वाहनधारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवतात आणि त्याद्वारे सायकल घेऊन जातात. परंतु, राज्यात अशा वाहनांवर परिवहन विभाग, पोलीस प्रशासनातर्फे कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा वाहनांवर यापुढे कोणत्याही प्रकारची कारवाई करू येऊ नये, असे निर्देश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी परिपत्रक जारी करून दिले आहेत.

अनेक वाहनधारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून सायकल वाहून नेताना आढळतात. मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमात वाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरीअर लावण्याबाबत कुठेही प्रतिबंध नाही, असे असतानाही सदर वाहनांवर परिवहन विभाग, तसेच पोलीस विभागाच्या अंमलबजावणी पथकांकडून कारवाई करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण, अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे बसविण्यात आलेल्या सायकल कॅरीअरद्वारे सायकली वाहून नेण्यात येत असतील तर त्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.