मुंबई : उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून पंधरा जिल्ह्यांतील ६३३ गावे, १६५२ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वाढत्या तापमानामुळे विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीस्त्रोत कोरडे पडू लागल्याने अनेक ग्रामीण भागांमध्ये टँकर हा नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार ठरत आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे आणि १६५२ वाड्यांमध्ये एकूण ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या टँकरमध्ये ३३ सरकारी तर ६६९ खासगी टँकरचा समावेश आहे.
ठाणे विभागात सर्वाधिक १७७ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात १५६ गावे आणि ४४४ वाड्यांसाठी १५९ टँकर कार्यरत आहेत. पुणे विभागात १४५ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागात १३८ गावे आणि ६४ वाड्यांसाठी एकूण २४४ टँकर कार्यरत असून, राज्यातील सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर विभागात सुरू आहेत. अमरावती विभागात १७ गावांसाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात अद्याप टँकरची गरज भासलेली नाही.
उन्हाची वाढती तीव्रता आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरद्वारे पाणी पुरवठ्याबरोबरच पर्यायी जलस्रोतांचा वापर, बोअरवेल, विहिरींचे अधिग्रहण आणि जलसाठ्यांचे नियोजनावर भर दिला जात आहे. गामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला णी टंचाईग्रस्त भागांमध्ये आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
