Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

दोन ते तीन आठवडे दडी मारल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.

monsoon
पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

दोन ते तीन आठवडे दडी मारल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडत आहे.  भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पुढील २४ तासांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतही पुढच्या काही तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

गेल्या ३ दिवसांपासून विदर्भातही पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्यानं पिक सुकू लागली होती. तसेच ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते मात्र, वेळेवर पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे. पाऊस पडत असल्याचने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, त्यामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, महापुराचा फटका बसल्यानंतर कोकणामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra weather alert today heavy rainfall alert by imd to mumbai thane hrc

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या