मुंबई : महारेराने १०,७७३ व्यपगत गृहप्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. ही नोटीस मिळताच तब्बल ५,३२४ प्रकल्पांनी योग्य प्रतिसाद दिला असून यापैकी ३,५१७ प्रकल्पांनी निवासी दाखला सादर केला आहे. तर ५२४ प्रकल्पांनी मुदतवाढ मागितली आहे. त्याच वेळी दुसरीकडे प्रतिसाद न देणाऱ्या १,९५० पैकी १,९०५ प्रकल्पांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच प्रतिसाद न देणाऱ्या अन्य ३४९९ प्रकल्पांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे.

‘रेरा’ कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांना नोंदणी करताना प्रकल्प केव्हा पूर्ण होणार याची निश्चित तारीख नमूद करणे बंधनकारक आहे. या तारखेपर्यंत प्रकल्प पूर्ण करून त्याची संपूर्ण माहिती महारेराला सादर करणेही बंधनकारक आहे. या तारखेपर्यंत प्रकल्प पूर्ण झाला नाही, तर प्रकल्पांना मुदतवाढ दिली जाते. काही अडचणी असल्यास प्रकल्प रद्द करण्याचीही तरतूद कायद्यात आहे. असे असताना राज्यातील मोठ्या संख्येने प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण केले जात नसल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. अनेक प्रकल्प मुदतवाढ वा इतर कोणतीही प्रक्रिया करीत नसल्याचेही स्पष्ट झाले.

Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Hasan Mushrif assures that Rs 2100 will be given to the sisters who are fond of scissors for development works
विकासकामांना कात्री पण लाडक्या बहिणींना २१०० रुपये; हसन मुश्रीफ यांची ग्वाही
notices given by Maharera last month to lapsed projects have received positive response
व्यपगत साडेदहा हजार प्रकल्पांपैकी पाच हजार ३२४ प्रकल्पांकडून प्रतिसाद! उर्वरित साडेतीन हजार गृह प्रकल्पांवर कारवाई होणार
Budget Out of 36 thousand crores, only 18 thousand crores were spent Mumbai news
अर्थसंकल्पाचा फुगवटा यंदाही कायम? ३६ हजार कोटींपैकी केवळ १८ हजार कोटीच खर्च
Crime against developer who stalled Zhopu scheme Mumbai news
झोपु योजना रखडवणाऱ्या विकासकाविरुद्ध गुन्हा; प्रलंबित योजनांचा आढावा घेऊन कठोर कारवाई करणार
Three months jail developers , Mumbai ,
मुंबईतील तीन विकासकांना तीन महिन्यांचा कारावास, महारेराच्या आदेशाचे पालन न केल्याने महारेरा अपलीय न्यायाधीकरणाचा निर्णय
maharera relaxed the condition for 500 projects to appoint a developer association as a self regulatory body
आता ५०० ऐवजी २०० प्रकल्प असल्यास विकासकांच्या संघटनेस स्वयंविनियामक म्हणून मान्यता, महारेराचा महत्त्वपूर्ण निर्णय

हेही वाचा >>>जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरण : आरोपी चेतन सिंह मानसिक आजाराने ग्रस्त, अकोला 

कारणे दाखवा नोटिसा

राज्यातील १०,७७३ प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार ३० दिवसांत या प्रकल्पांनी समाधानकारक उत्तर देणे अपेक्षित होते. या नोटिशीनंतर विकासकांनी, प्रकल्पाच्या प्रवर्तकांनी अखेर चांगला प्रतिसाद दिला आहे. १०,७७३ पैकी ५३२४ प्रकल्पांनी योग्य प्रतिसाद दिला आहे. मात्र त्याच वेळी उर्वरित पाच हजार प्रकल्पांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली आहे.

ग्राहकांना दिलासा

प्रतिसाद दिलेल्यांपैकी ३५१७ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांनी तशी माहिती सादर केली आहे. तर ५२४ प्रकल्पांना लवकरच मुदतवाढ मिळणार असून २८३ प्रकल्पांच्या प्रतिसादांची छाननी सुरू आहे. महारेराच्या या कारवाईमुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, असा विश्वास महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी व्यक्त केला.

Story img Loader