मुंबई: रेरा कायद्यानुसार दर तीन महिन्यांनी नोंदणीकृत प्रकल्पाची माहिती अद्ययावत न करणाऱ्या १९ हजारांहून अधिक प्रकल्पांना महारेराने नोटिसा बजावल्या होत्या. या दणक्यानंतर संबंधित विकासक अखेर जागे झाले. त्यांनी अद्ययावत केलेल्या माहितीनुसार ७०० प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर, ७०५ प्रकल्पाच्या नूतनीकरणाचे अर्ज सादर झाले आहेत.

रेरा कायद्यानुसार नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणीसह अटी आणि तरतुदीचे पालन करणेही बंधनकारक आहे. तसेच दर तीन महिन्यांनी प्रकल्पाची माहिती अद्ययावत करून ती संकेतस्थळावर टाकणेही बंधनकारक आहे. मात्र, या नियमाचे विकासकांकडून उल्लंघन करण्यात येते. त्यामुळे अशा प्रकल्पाविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेत महारेराने डिसेंबर २०२२ मध्ये १९ हजार ५३९ प्रकल्पांना माहिती अद्ययावत करा, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला होता. त्यानंतर विकासक जागे झाले. जानेवारीत ७०० प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. तसेच प्रकल्प नूतनीकरणासाठीही मोठय़ा संख्येने विकासक पुढे आले आहेत. आतापर्यंत महिन्याला सरासरी १२० अर्ज नूतनीकरणासाठी येत होते. कारवाईच्या इशाऱ्यानंतर चक्क ७०५ अर्ज जानेवारी २०२३ मध्ये दाखल झाले आहेत.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…

पुन्हा इशारा..
मोठय़ा संख्येने विकासक माहिती अद्ययावत करत असून ही समाधानकारक बाब आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल. दरम्यान, माहिती अद्ययावत करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप माहिती अद्ययावत केलेली नाही त्यांनी लवकर अद्ययावत करावी आणि अन्यथा कारवाई करू, असा इशारा महारेराने दिला आहे.