मुंबई : वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुद्दसर लांबे यांचे दाऊदबरोबर असलेल्या संबंधाच्या संभाषणाची ध्ननिफीत  विधानसभेत सादर करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दाऊदच्या हस्तकांचा भरणा असल्याचा गंभीर आरोप केला.

अर्थसंकल्पीय चर्चेच्या भाषणाच्या अखेरीस फडणवीस यांनी वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. लांबे आणि मोहमद अरशद खान यांच्यातील संभाषणाची ध्वनिफीतच फडणवीस यांनी सभागृहात सादर केली.

I challenge Modi Said Mallikarjun Kharge
“मोदींमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी ‘हे’ करावं”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं जाहीर आव्हान!
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान

या ध्वनिफितीत डॉ. लांबे हे अरशद खान यांना आपले दाऊदशी असलेल्या संबंधांबाबत सारी माहिती देत आहेत. आपले सासरे हे दाऊदचे उजवे हात होते. आपले लग्न दाऊदची बहीण हसीना पारकर हिने जमविले होते. हसीना  पारकर व भाऊ इक्बालची पत्नी आपले जवळचे आहेत. जरा काहीही झाले की सारे दाऊदपर्यंत पोहचते, असे डॉ. लांबे सांगत होते. वक्फ बोर्डाचा सदस्य म्हणून आपल्याकडे बरेच अधिकार आहेत. पाहिजे तेवढे पैसे कमावू शकतो. या बोर्डात कामे सुरू कर. अर्धे तुझे तर अर्धे माझे, असे डॉ. लांबे यांचे संभाषण आहे.

दाऊदच्या लोकांचीच या सरकारमध्ये नियुक्ती केली जाते का, असा सवाल फडणवीस यांनी केला. त्यावर डॉ. लांबे यांची सरकारने नियुक्ती केली नसून ते निवडणुकीच्या माध्यमातून या बोर्डावर निवडून आल्याचे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. डॉ. लांबे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.   त्यांनी गेल्या वेळी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादीच्या वतीने माहीममधून लढविली होती.