महाराष्ट्रातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा बुधवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांसह सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ होत आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, हा प्रकल्प महायुती सुरू करत असली तरी निश्चितपणे राज्यातील पुढील सरकार महाविकास आघाडीचे आहे आणि हे सरकार हा प्रकल्प पूर्ण करेल.

हेही वाचा – Girish Mahajan : “ते पक्ष सोडून गेले, त्यांच्या पत्नी देखील निवडून आल्या नाही”, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका

हेही वाचा – Ashok Chavan : “आमच्याबरोबर राहिले तर सुरक्षित राहतील”, अशोक चव्हाणांचा ‘या’ नेत्याला इशारा

रोहित पवार यावेळी या प्रकल्प उभारणीबद्दल बोलताना म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे. मागील अडीच वर्षे अनेक प्रकल्प गुजरातला गेले, त्याऐवजी त्या प्रकल्पांचे महाराष्ट्रात उद्घाटन केले असते तर आम्हाला जास्त आनंद झाला असता व लाखो तरुणांच्या हाताला काम मिळाले असते, असा टोला त्यांनी सरकारला लगावला.