लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात गुरूवारी होत असून त्यानिमित्त आझाद मैदान आणि आसपसच्या परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. हे बदल गुरूवारी दुपारी १२ वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहणार आहे. यावेळी आझाद मैदान परिसरात वाहने उभी करण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक व कार्यकर्त्यांनी रेल्वेने यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Proposal to set up a new super specialty hospital in Pune news
पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होणार! लवकरच नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Municipal Corporation Election, Pimpri Chinchwad ,
पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
Changes in traffic on national and state highways on occasion of Jijau Jayanti
जिजाऊ जयंतीनिमित्त ‘या’ राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…

शपथविधीच्या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार महानगरपालिका मार्ग:- छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन ) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दरम्यान दोन्ही वाहिन्या बंद ठेवण्यात येतील. तेथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी एल. टी. मार्ग, चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन. रोड छत्रपती शिवाजी महाराज – जंक्शन (सीएसएमटी जंक्शन) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

आणखी वाचा-पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया वैध; प्रवेश प्रक्रियेला आव्हान देणारी विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

तसेच विरुद्ध दिशेने जणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी मार्गही आवश्यतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी एल.टी. मार्ग चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन रोड, सीएसएमटीवरून इच्छितस्थळी मार्गस्थ व्हावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

याशिवाय हजारीमल सोमानी मार्गावरील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनपर्यंत (सीएसएमटी जंक्शन) वाहतूक प्रतिबंधित असेल. पर्यायी व्यवस्था म्हणून चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) हुतात्मा चौक – काळा घोडा, के. दुभाष मार्ग – शहिद भगतसिंग मार्गाचा वापर करावा. तसचे प्रिन्सेस स्ट्रिट पूल (मेघदुत ब्रिज) (दक्षिण वाहिनी) (एन. एस. रोड, तसेच सागरी किनारा मार्गाने श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येईल. येथून जाणारी वाहने एन. एस. रोड मार्गे वळविण्यात येणार आहेत. तसचे रामभाऊ साळगांवकर रोड (एक दिशा मार्ग) रामभाऊ साळगांवकर रोडवरील इंदु क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक ते व्होल्गा चौक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुहेरी मार्गिका दुपारी १२.०० वा. ते २०.०० पर्यंत खुली करण्यात येत आहे. शपथविधीच्या अनुषंगाने आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व अतिमहत्त्वाचे व्यक्ती येणार असल्यामुळे सामान्य नागरिकांनी आझाद मैदान व छत्रपती शिवाजी टर्मिनस (सी एस एम टी) येथून प्रवास करताना योग्य नियोजन करावे, तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक बदलाबाबतचे आदेश पोलीस वाहतूक विभागाच्या उपायुक्त(दक्षिण) प्रज्ञा जेडगे यांनी जारी केले आहे.

Story img Loader