Malad West Assembly constituency 2024 Congress Aslam Shaikh vs NDA : मालाड पश्चिम हा विधानभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा येतात. ज्यामध्ये बोरिवली, कांदिवली, चारकोप, मालाड पश्चिम, मागाठाणे आणि दहिसर या मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी मालाड पश्चिम मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत. तर मालाड पश्चिम विधानसभा मविआकडे आहे. काँग्रेसचे नेते अस्लम शेख हे येथील विद्यमान आमदार आहेत. २००९ साली हा मतदारसंघ तयार करण्यात आला होता. तेव्हापासून अस्लम शेख सलग तीन वेळा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसलाच सुटेल अशी शक्यता आहे. शिवसेनेचा ठाकरे गट ही जागा मागू शकतो. मात्र काँग्रेसचे अस्लम शेख यांनी त्यांची दावेदारी मजबूत केली आहे. मात्र शेख यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध होत आहे. काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते येथून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अंतर्गत वाद मिटवून शेख यांना पुन्हा उमेदवारी कशी द्यायची हा पेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे आहे. दुसऱ्या बाजूला भाजपा व शिंदे गट हे अस्लम शेख यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेख यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर ते महायुतीच्या मार्गावर जाऊ शकतात.

Supriya Sule Sunil Tingre
Supriya Sule : “…तर तुम्हाला कोर्टात खेचेन, सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस”, सुप्रिया सुळेंचा दावा
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Congress Candidates List
Congress Candidates List : मविआच्या जागा वाटपात काँग्रेस शंभरी पार, सम-समान फॉर्म्युल्यावर प्रश्नचिन्ह!
Mahayuti Candidate List vs Maha Vikas Aghadi Candidate List in Marathi
Mahayuti vs Maha Vikas Agahdi Candidate : उद्या मतदान, तुमच्या मतदारसंघातील उमेदवार जाणून घ्या!
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!
Jogeshwari East Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Jogeshwari East Vidhan Sabha Constituency 2024 : मनिषा वायकरांसमोर दोन्ही ठाकरेंच्या उमेदवारांचं तगडं आव्हान

हे ही वाचा >> घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीची वाट खडतर, लोकसभेनंतर चिंता वाढली!

काँग्रेसचे अस्लम शेख हे १५ वर्षांपासून मालाड पश्चिमचे आमदार आहेत

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शेख यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती. त्याचबरोबर ते शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे दावे देखील केले गेले. मात्र पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा विधानसभेचं तिकीट दिलं आणि शेख यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवला. शेख यांनी त्यावेळी भाजपाच्या रमेश सिंग ठाकूर यांचा १० हजार मतांनी पराभव करत तिसऱ्यांदा विधानसभा गाठली होती.

महायुतीत उमेदवारीसाठी स्पर्धा

दुसऱ्या बाजूला मालाड पश्चिममधून उमेदवारी मिळाली यासाठी महायुतीत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचा शिंदे गट आग्रही आहे. या मतदारसंघात ३० टक्के मुस्लीम मतदार आहेत. तसेच कोळी व मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. भाजपाकडून रमेश सिंग ठाकूर हे येथून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला

हे ही वाचा >> जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, मविआतही संघर्ष! यंदा नवा आमदार मिळणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर या जागेवर भाजपा उमेदवार पीयूष गोयल यांनी सहज विजय मिळवला. मात्र त्यांना मालाड पश्चिम मतदारसंघात आघाडी मिळवता आली नव्हती. काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांना या मतदारसंघात मताधिक्य मिळालं होतं. मात्र इतर पाच मतदारसंघातील आघाडीमुळे गोयल यांना सहज विजय मिळवता आला.

मढ, मार्वे, मालवणी,मनोरा ,मालाड पश्चिमचा भाग मिळून बनलेला हा मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे सर्वात जास्त म्हणजेच ३ नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे ३ नगरसेवक आहेत.आमदार होण्यापूर्वी अस्लम शेख हे या मतदारसंघातून एकदा समाजवादी पार्टीच्या तिकीटावर तर एकदा काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?

या मतदारसंघात १.९० लाख मतदारांची संख्या आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

अस्लम शेख (काँगेस) : ७९,४९४
रमेश सिंग ठाकूर (भाजपा) – ६९,०९२

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

अस्लम शेख (काँगेस) : ५६,५७४
राम बारोट (भाजप) : ५४,२७१
विनय जैन (शिवसेना) : १७,८८८
दीपक पवार (मनसे) : १४,४५२

भाजपा विरुद्ध काँग्रेस थेट सामना

मालाड (पश्चिम) मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. मतदारसंघातून एकूण २७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन अर्ज बाद करण्यात आले आहे, तर एक अर्ज मागे घेण्यात आला आहे. भाजपाने येथून विनोद शेलार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर, काँग्रेसने त्यांच्याविरोधात अस्लम शेख यांना उमेदवारी दिली आहे.

चुरशीची लढाई

या मतदारसंघावर काँग्रेसचा वरचष्मा असला तरी विनोद शेलारांसाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र शिवसेनेची (ठाकरे) मतं मिळणार असल्यामुळे अस्लम शेख यांचं पारडं देखील जड झालं आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.मुंबई उपनगरांत ५५.७७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघात मतदारांकडून संमिश्र प्रतिसाद होता. या मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळे लोकसभेप्रमाणे मतदारांची अडचण झाली नाही.

Story img Loader