मालेगाव येथील व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये १४ खाती उघडून त्यातील रकमेचा निवडणुकीसाठी कथित गैरवापर केल्याच्या आरोप प्रकरणातील सक्तवसुली संचलनालय करत असलेल्या तपासाची व्याप्ती वाढली आहे. हा गैरव्यवहार १२०० कोटी रुपयांचा असल्याचा संशय असून बनावट कंपनीद्वारे २१ बँक खात्यांतून करण्यात आलेल्या ८०० कोटी रपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यापैकी बहुसंख्य कंपन्या एकल मालकीच्या असून त्या नवी मुंबई, सुरत,अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणात राजकीय पक्ष व व्यक्तीच्या सहभागाबाबतही ईडी तपास करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील सिराज अहमद हारून मेमनने नाशिक मर्चंड को ऑप बँकेसह दोन बँकांमध्ये सुमारे १४ बँक खाती उघडल्याप्रकरणाशी संबंधित २८ ठिकाणी नुकतेच ईडीने छापे टाकले होते. मेमनला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाला ‘वोट जिहाद फंडिंग’ गैरव्यवहार असे म्हटले आहे. तसेच या बेनामी बँक खात्यांमधून पैसे काढून निवडणुकीत गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai Ravi Raja opposed for Municipal administration decided to tax commercial slums
व्यावसायिक स्वरुपाच्या झोपड्यांना मालमत्ता कर लावण्यास विरोध, माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचे आयुक्तांना पत्र
fraud with aqua marine global culture company
एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीची फसवणूक
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक
Torres
Torres Scam : टोरेस फसवणूकप्रकरणी आरोप असलेले सीए अभिषेक गुप्तांची न्यायालयात धाव; वकील म्हणाले, “युक्रेनिअन माफिया…”
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
mumbai torres jewellers loksatta news
टोरेस फसवणूकप्रकरणी पोलीस ठाण्यासमोर गर्दी, ठेवीच्या परतफेडीसंदर्भात हजारो गुंतवणूकदारांचे अर्ज

हेही वाचा >>>‘ईव्हीएम हॅकिंग’चा दावा करणाऱ्यावर गुन्हा, मुंबईतील सायबर पोलिसांकडून तपासाला सुरूवात

आरोपी सिराजने मालेगावमधील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत अनेक बँक खाती उघडली होती. नागरिकांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यासाठी नवा व्यवसाय सुरू करीत  असल्याचे त्याने भासवले होते. सिराजने कृषी व्यवसायासाठी बँक खाती उघडण्यास सांगितले होते. त्याबदल्यात त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम देण्याचे आश्वासन दिले होते, असे तक्रारदार जयेश मिसाळ यांनी पोलिसांना सांगितले. सिराजने मिसाळ यांच्याप्रमाणेच इतर ११ जणांची बँकेत खाती उघडली होती. या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे आणि ते अन्य खात्यात वळविण्यात येत असल्याचे नंतर मिसाळ आणि अन्य खातेदारांच्या लक्षात आले. या प्रकाराचा मिसाळ आणि इतर खाताधारकांना धक्का बसला. त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. सिराजने आपला बँक खात्यांचा गैरवापर करून त्यात बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तपासात मालेगाव येथील १४ बँक खात्यांमधून एकल मालकी कंपन्याच्या २१ बँक खात्यांवर ९५ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. तपासात नवी मुंबई, सुरत,अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील २१ बनावट कंपन्यांची माहिती मिळाली असून त्यांच्या बँक खात्यात गेल्या तीन ते चार महिन्यात ८०० कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या १४ बँक खात्यांमधूनही रक्कम काढण्यात आली असून ती रक्कम संबंधित ठिकाणी पोहोचवण्यासाठी हवाला रॅकेटचा वापर झाल्याचा संशय आहे.

Story img Loader