वीकएण्ड जवळ येत असून अनेक जण कुठे ना कुठे पिकनिकला जाण्याचा प्लान करत असतील. पिकनिकची वेगवेगळी ठिकाणे तुम्ही सर्च करत असाल तर तारकर्ली बीच उत्तम ठिकाण आहे. नारळी पोफळीच्या बागा, बांबू- सुपारीची झाडे, मऊ-पांढरी शुभ्र वाळू आणि अथांग पसरलेला सागर मनमोहून टाकणारे तारकर्ली समुद्र किनाऱ्याचे हे सौंदर्य निश्चित तुमच्या मनाला भुरळ पाडेल. इथल्या मऊ वाळूत पावले टाकताना मनाला एक प्रसन्नता तर मिळतेच पण त्याचबरोबर तुम्ही इथे बोट राईड, वॉटर स्पोटर्सचाही आनंद लुटू शकता. स्पीड बोट, पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंगचीही व्यवस्था आहे.

तारकर्लीपासून मालवण किल्ला, चिवळा बीच ही ठिकाणे सुद्धा जवळ आहेत.

Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

मालवण किल्ल्याजवळही स्कूबा डायव्हिंगची सोय आहे.

तारकर्ली कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून मालवणपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. तारकर्लीमध्ये वेगवेगळी हॉटेल असून निवासाचीही उत्तम व्यवस्था आहे. सी-फूड सुद्धा इथली एक खासियत आहे.

तारकर्ली मुंबईपासून ५४० किलोमीटर अंतरावर असून तुम्ही रेल्वे आणि विमानाने सुद्धा जाऊ शकता.

गोव्याचा दाबोलीम जवळचा विमानतळ आहे.

ट्रेनने येण्यासाठी कुडाळ जवळचे स्टेशन असून तारकर्लीपासून कु़डाळ ४५ किलोमीटर अंतरावर आहे.