तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. यावेळी त्यांना काँग्रेसला वगळून भाजपाला पर्याय उभा राहिल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ममता बॅनर्जी यांनी कुणी लढतच नसेल तर आम्ही काय करायचं? असा सवाल विचारलाय. तसेच सर्वांनी जमिनीवर उतरून लढलं पाहिजे, असंही नमूद केलं.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटायला महाराष्ट्रात आले होते, मात्र त्यांची तब्येत खराब असल्यानं भेट होऊ शकली नाही. त्यांची तब्येत वेगाने तंदुरुस्त होवो अशी माझी प्रार्थना आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना माझ्या भेटीसाठी पाठवलं. त्यांनी माझ्याशी चर्चा केली. आज देशात जी फॅसिझमची परिस्थिती आहे त्याविरोधात एक भक्कम पर्याय उभा केला पाहिजे. हे काम एकटं कुणीही करू शकत नाही.”

Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी
anantkumar hegde
Loksabha Poll 2024 : संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या अनंतकुमार हेगडेंना डच्चू; भाजपातर्फे उत्तरा कन्नडमधून कोणाला संधी?

“शरद पवार यांच्या मताशी मी सहमत आहे”

ममता बॅनर्जी यांनी यावेळी शरद पवार यांचं कौतुक केलं. “शरद पवार ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्यासोबत मी अनेक वर्षांपासून काम करते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी आले. शरद पवार यांच्या मताशी मी सहमत आहे,” असं मत ममतांनी व्यक्त केलं.

“यूपीए कुठं आहे?”

पत्रकारांनी यूपीएचं नेतृत्व शरद पवार करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर ममता बॅनर्जींनी यूपीए कुठं आहे असा सवाल केला. यानंतर शरद पवार यांनी तात्काळ यावर बोलत विरोधीपक्षांमध्ये नेतृत्वावरून मतभेद नसल्याचं म्हटलं. तसेच आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याविषयी चर्चा केल्याचं सांगितलं.

हेही वाचा : “२०२४च्या निवडणुकांमध्ये…”, ममता बॅनर्जींसोबत चर्चेनंतर शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका!

काँग्रेसला वगळून भाजपाला पर्याय उभा राहिल का? यावर ममता म्हणाल्या, “जे लढतात असा एक शक्तीशाली पर्याय असला पाहिजे. जर कुणी लढत नसेल तर आम्ही काय करायचं? मला वाटतं सर्वांनी जमिनीवर राहून लढलं पाहिजे.”

“पश्चिम बंगाल-महाराष्ट्राचे जुने संबंध”

बैठकीनंतर शरद पवारांनी ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्याविषयी त्यांचं अभिनंदन केलं. “ममता बॅनर्जी यांच्या इथे येण्याच्या मागे साहजिकच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने संबंध आहेत. अनेक साधर्म्य या दोन राज्यांमध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मुंबईला भेट दिली आहे. उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना भेटू शकले नाहीत. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली आहे. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली”, असं शरद पवार म्हणाले.

“भाजपाला पर्याय द्यायला हवा”

यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपाला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासाठीच ममता बॅनर्जी यांनी आमची भेट घेतल्याचं देखील ते म्हणाले. “आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर सारख्या विचारांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासोबतच, सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय उपलब्ध व्हायला हवा. यासाठीच त्यांनी आमची भेट घेतली आहे. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“…तर भाजपाचा पराभव करणं सोपं”, ममता बॅनर्जींनी मुंबईत दिले भाजपाविरोधी आघाडीचे संकेत!

कुणालाही वगळण्याचा प्रश्नच नाही

दरम्यान, ममता बॅनर्जी भाजपाविरोधी आघाडीमध्ये काँग्रेसला वगण्याच्या भूमिकेत असताना शरद पवारांनी मात्र त्यावर वेगळी भूमिका घेतली आहे. “काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय हा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच नाही. भाजपाविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचं असेल, तर त्यांचं स्वागत आहे. नेतृत्व हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, आमच्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देणं हा महत्त्वाचा विषय आहे. कुणाचं नेतृत्व वगैरे ही दुय्यम बाब आहे. कुणाला वगळण्याचा प्रश्न नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा मुद्दा आहे. ज्याची मेहनत करायची तयारी आहे, सगळ्यांसोबत काम करण्याची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन चालायचं”, असं शरद पवारांनी यावेळी नमूद केलं.