scorecardresearch

मुंबईः प्रेयसीवर चाकूने हल्ला करणाऱ्या प्रियकराला अटक

जखमी तरूणीला पोलिसांनी तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल केले.

मुंबईः प्रेयसीवर चाकूने हल्ला करणाऱ्या प्रियकराला अटक
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

प्रेयसीवर चाकूने हल्ला करणाऱ्या प्रियकराला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. राजेंद्र दीपक परब असे प्रियकराचे नाव असून लग्नावरून झालेल्या वादातून त्याने हा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले. बोरिवली येते राहणाऱ्या तरुणीचे राजेंद्रसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तो तिच्यावर सतत संशय घेत होता. त्यातच तिच्या कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे तिने त्याच्याशी संबंध तोडून टाकले होते. तरीही राजेंद्र तिला सतत दूरध्वनी करून मानसिक त्रास देत होता. तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिच्याशी वाद घालून शिवीगाळ करीत होता.

हेही वाचा >>> एसटीच्या कुर्ला नेहरू नगर आगारातील वाहन तपासणी केंद्र मंजुरीच्या प्रतीक्षेत; राज्य शासनाकडे सादर

गुरुवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी कामावरुन घरी जाण्यासाठी ती निघाली. यावेळी मालाड सबवे, पुष्पा पार्क बसस्टॉपजवळ राजेंद्र आला. तिच्याशी त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे तो तिच्याशी वाद घालून तिला शिवीगाळ करू लागला. त्यानंतर काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्याकडील चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. ती जागीच कोसळली. या घटनेनंतर राजेंद्र तेथून पळून गेला होता. ही माहिती मिळताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरूणीला पोलिसांनी तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार करण्यात आले. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी राजेंद्रविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी राजेंद्रला अटक केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 00:37 IST

संबंधित बातम्या