अभिनेत्रीला शिवीगाळ करणाऱ्यास अटक

भोजपूरी अभिनेत्री कोयल धिल्लो हिला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या एकास ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. राज मल्होत्रा असे या आरोपीचे नाव असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.ओशिवरा येथे राहणारी कोयल भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री आहे.

भोजपूरी अभिनेत्री कोयल धिल्लो हिला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या एकास ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. राज मल्होत्रा असे या आरोपीचे नाव असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.ओशिवरा येथे राहणारी कोयल भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री आहे. नुकतेच तिने एका भोजपुरी चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटाच्या डबिंगवरून राज मल्होत्राशी तिचा वाद सुरू होता. मल्होत्रा याने दुसऱ्या तरुणीकडून डबिंग करवून घेतले होते. त्यावरून हा वाद सुरू होता. त्यावरून मल्होत्रा याने कोयलला अश्लील शिवीवाळ केली होती. कोयलने याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मल्होत्रा याला अटक केली. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man arrested for abusing bhojpuri actress