scorecardresearch

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यास मुंबईतून अटक

आरोपीकडून  मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे. आरोपी एखाद्या संघटनेशी संबंध आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

arrest
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : भाजपच्या निलंबीत नेत्या नुपूर शर्मा यांचे वक्तव्य आणि राजस्थानमध्ये झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ट्वीट करून धमकी देणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वांद्रे येथून अटक केली. आरोपीविरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझवान तौफिक रेहमान शेख (२५) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो वांद्रे पश्चिम येथील रहिवासी आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शिवप्रसाद पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.  आरोपीकडून  मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे. आरोपी एखाद्या संघटनेशी संबंध आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man arrested for creating religious rift in mumbai zws

ताज्या बातम्या