scorecardresearch

Premium

अंधेरी येथे ६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

ओळखीचा फायदा उचलून आरोपीने पीडित मुलीवर शनिवारी सायंकाळी लैंगिक अत्याचार केले.

man arrested for sexually assaulting 6 year old girl in andheri
(संग्रहित छायचित्र) : फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

मुंबईः सहा वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३० वर्षीय तरूणाला शनिवारी रात्री अंधेरी पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व पीडित मुलगी एकाच परिसरात राहतात. त्या ओळखीचा फायदा उचलून आरोपीने पीडित मुलीवर शनिवारी सायंकाळी लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती तिच्या आईला मिळाल्यानंतर तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३७६(२) (जे), ३७६(२) व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपीला शनिवारी रात्री अटक केली.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man arrested for sexually assaulting 6 year old girl in andheri mumbai print news zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×