लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः सांताक्रुझ येथे २७ वर्षीय तरूणाने मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली. आरोपीला त्याच्या मित्राने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. त्या रागातून आपण त्याची हत्या केल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सोमवारी आरोपीला अटक केली आहे.

अंकित शरद चव्हाण (२०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अंकित हा त्याच्या दोन भाऊ आणि आईसोबत राहायचा आणि पेस्ट कंट्रोल एजन्सीमध्ये काम करत होता.अंकितचा मित्र गौरव जाधव याच्या तक्रारीवरून याप्रकरणी हत्येचा गुन्ह दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी स्वप्नील जाधव(२७) याला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे.

आणखी वाचा-विज्ञानाच्या प्रवेशासाठी चढाओढ, मुंबई विभागाचा निकाल ९१.९५ टक्के; गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ

अंकितने आपल्याला अलीकडेच मारहाण केली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्याने चाकूने वार केले, असे चौकशीत आरोपी स्वप्नीलने सांगितले आहे. यावेळी गौरव जाधव हाही घटनास्थळी उपस्थित होता. अंकितला वाचवण्यासाठी गौरव धावून गेला पण त्यापूर्वी स्वप्नीने त्याच्यावर दोनवेळा चाकूने वार केले होते. गौरवने इतरांसोबत स्वप्नीलला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अंकित वडील नव्हते. अंकितची आईला घटनेमुळे मानसिक धक्का बसला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.