पत्नीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या अजय पिल्लेला जिल्हा सत्र न्यायालयाने पाचवर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विकृत मानसिकतेच्या अजयने पत्नीसोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ बनवला व नंतर तो व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करुन व्हायरला केला तसेच परिसरातील स्थानिक मुलांनाही ती क्लिप पाठवली. जेव्हा पत्नीला याबद्दल समजले तेव्हा तिने पुण्याच्या मूळा नदीत उडी मारुन आत्महत्या केली.

पाच मे रोजी अजयला न्यायालयाने दोषी ठरवले. मार्च २०१५ मध्ये ही घटना घडली होती. पेशाने ड्रायव्हर असलेले अजय पत्नी जयश्रीसोबत पुण्यामध्ये राहत होता. अजयचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे. २ ऑगस्ट २०१५ रोजी जयश्री घरातून बाहेर पडली व तिने मूळा नदीत उडी मारुन आत्महत्या केली. जयश्रीचा मृतदेह मिळाल्यानंतर तिचा भाऊ रोहित सोनावणेने अजय विरोधात तक्रार दाखल केली. अजयने बनवलेल्या त्या अश्लील व्हिडिओमुळेच आपल्या बहिणीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याने केला.

cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
Video 5 Minutes Jugaad to Clean Water Tanki At Home Remove All Dirt Stickiness
टाकी रिकामी न करता फक्त ५ मिनिटांत काढून टाका गाळ; आत उतरण्याचीही गरज नाही, पाहा जुगाडू Video
actress surabhi bhave rply to fan
“सेक्सी व्हिडीओ पाठव” म्हणणाऱ्या नेटकऱ्याला मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली “तुझ्या…”
Video: ‘तू खूप सेक्सी दिसतेस’; १६ वर्षीय बॉल गर्लला पाहून पंचाची शेरेबाजी

अजयचे दुसऱ्या महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. त्याला जयश्रीकडून घटस्फोट हवा होता. अजय अनेकदा पत्नीला मारहाणही करायचा असे रोहितने त्याच्या तक्रारीत म्हटले होते. जयश्री घटस्फोट द्यायला तयार नव्हती. जयश्रीने घटस्फोटांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी यासाठी अजयने पत्नीसोबतचा सेक्स व्हिडिओ बनवला असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

आपल्याला पुन्हा लग्न करायचे असून त्यामध्ये आडकाठी केलीस तर व्हिडिओ सार्वजनिक करीन अशी धमकी त्याने जयश्रीला दिली होती. जयश्री ऐकत नसल्याने अखेर त्याने हा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर परिसरातील स्थानिक मुले जयश्री जाताना तिच्याबद्दल अश्लील कमेंटस करायची. या सर्व प्रकारामुळे जयश्रीला घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यामुळे तिने आत्महत्येचा टोकाचे पाऊल उचलले असे पोलिसांनी कोर्टाला सांगितले. सुनावणीत अजयवरचे आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.