चेंबुर येथील विश्वेश्वर मंदिराची भींत कोसळून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास या मंदिराचे नाव आणि मंदिराच्या विश्वास्तांची नावे लिहीलेली भिंत अचानक कोसळली यात विशाल वागुडे (८) आणि अंजली म्हस्के (७) या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनाचा तपास सुरु आहे.