मुंबई : कांदळवनाचे महत्त्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी, त्यांना कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात अखेर कांदळवन उद्यान उभे राहणार असून नुकतीच दहिसर येथील कांदळवन उद्यानाला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली आहे. या परिसरात कांदळवन उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु, प्रकल्प प्रत्यक्ष साकरण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

मानवी जीवनासाठी आणि नैसर्गिक जैवविविधता टिकून राहण्यात कांदळवनाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कांदळवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याची शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देण्यासाठी व त्यातून जनप्रबोधन करून जनतेच्या मनात कांदळवन परिसंस्थेबाबत आपुलकी निर्माण करण्यासाठी मुंबईत कांदळवन उद्यान उभे करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. दहिसर आणि गोराई येथे हे उद्यान उभे राहणार आहे. त्यातील गोराई कांदळवन उद्यानाचे काम सुरू झाले आहे.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

तेथे आठ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्चून तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्चून कांदळवन उद्यान विकसित केले जाणार आहे. मुंबईत एकूण ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये कांदळवनांच्या विविध जाती आणि त्याचे पर्यावरण साखळीतील महत्त्व पटवून देणारा हा अशा प्रकारचा पहिलाच पर्यावरण पर्यटन प्रकल्प आहे.

* दहिसर येथील उद्यानातील मुख्य इमारतीचे क्षेत्रफळ ३ हजार ३०५.५८ चौ.मी. आणि संग्रहालयचे बांधकामाचे क्षेत्रफळ २ हजार ४०९ .० ९ चौ.मी. इतके असणार आहे.

* ‘नेचर इंटरप्रिटेशन सेंटर’च्या इमारतीपासून वॉक वे, अप्रोच रोड, बॅटरीवर चालणारी वाहने, आभासी संग्रहालय, पर्यावरणीय पर्यटनासाठी कांदळवनांची सफर, काचेचा पूल आणि आकर्षक प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे.

* या उद्यानाच्या कामासाठी आवश्यक निधी निसर्ग संरक्षण, संवर्धन, पर्यटन व विकास या राज्यस्तरीय योजनेंतर्गत प्रस्तावित आहे. उद्यान विकसित करण्यासंदर्भातील अंदाजपत्रक मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यांनी तयार केले असून त्यास एमएमआरडीएच्या मुख्य अभियंत्यांना मान्यता मिळाली आहे.