मुंबई : गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर-म्हैसकर, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली.
मिलिंद म्हैसकर यांच्याकडे वन विभागाचा अतिरिक्त कार्यभार तूर्तास ठेवण्यात आला आहे. गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल हे सेवानिवृत्त होत असून त्यांची नेमणूक मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.
गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिवपद प्रशासनात मुख्य सचिवानंतर दुसर्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद मानले जाते. या पदाची धुरा ज्येष्ठ सनदी अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नीला सत्यनारायणन, चंद्रा अय्यंगार, चित्कला झुत्शी, सुजाता सौनिक या महिला अधिकार्यांनी अलिकडील काळात गृह खात्याचे सचिवपद भूषविले होते.
एस. भुवनेश्वरी यांची माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक तर डॉ. एच. एस. वसेकर यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

