मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे शनिवारी दुपारी कोरोनामुळे निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये प्रमुख तसेच साहाय्यक भूमिका केल्या होत्या. अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.

अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह ‘गेला माधव कुणीकडे’ तसेच ‘अंदाज आपला आपला’, ‘भ्रमाचा भोपळा’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. सध्या त्यांची ‘सिंदुर की कीमत’ ही हिंदूी मालिका ‘दंगल टीव्ही’वर सुरू होती. काही दिवसांपूर्वी त्या ही मालिका सोडणार असल्याची बातमी समोर आली होती. तत्पूर्वी ‘स्टार प्लस’ या वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेशीही त्या जोडल्या गेल्या होत्या. या मालिकेत अनुपमा या नायिकेच्या आईचे पात्र त्यांनी साकारले होते. ‘झी टीव्ही’वरील ‘राजा बेटा’, ‘सपने सुहाने लडकपन के’ तर ‘स्टार भारत’वरील कालभैरव या गाजलेल्या हिंदी मालिकांतून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर ‘कहीं तो होगा’, ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘ऐसा कभी सोचा न था’ या त्यांच्या हिंदी मालिका विशेष गाजल्या. ‘स्टार प्रवाह’वरील ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतंय’ अशा मराठी मालिकांतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या. ‘डोक्याला ताप नाही’, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत ‘घनचक्कर’, ‘हे खेळ नशिबाचे’ अशा मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित कन्या आहे.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी