मुंबई : सध्या दहावी व बारावी परीक्षेच्या निकालानंतर सर्वत्र प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू आहे. परंतु करिअरच्या दृष्टीने नेमकी कोणत्या अभ्यासक्रमाची आणि महाविद्यालयाची निवड करावी, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम व गोंधळाची परिस्थिती आहे. या गोंधळलेल्या मनःस्थितीतून बाहेर कसे पडावे आणि विद्यार्थीदशेत वावरताना ताणतणावाचे नियोजन कसे करावे, याबाबत डॉ. हरीश शेट्टी व डॉ. राजेंद्र बर्वे हे ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेतून मार्गदर्शन करणार आहेत. ठाणे पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्गावरील हॉटेल टीप टॉप प्लाझा येथे ८ व ९ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा होईल. विद्यार्थीदशेत परीक्षा, निकाल, प्रवेश प्रक्रिया आणि नवीन अभ्यासक्रमाबाबत काहीसे दडपण असते. या दरम्यान भविष्यातील करिअरच्या संधींबाबतही चिंता सतावू लागते. या परिस्थितीत विद्यार्थी व पालकांमधील संवाद हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु सध्याची तरुणाई ही स्मार्टफोनसह समाजमाध्यमांमध्ये गुंतत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधील संवाद कमी होत आहे. संवादामध्ये अंतर निर्माण होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गोंधळलेली मनःस्थितीही वाढत जाते. या दरम्यान ताणतणावाचे नियोजन कसे करावे आणि विद्यार्थी व पालकांचे नाते घट्ट होऊन कसा मनमोकळा संवाद व्हायला हवा, याबाबत ठाण्यात ८ जून रोजी डॉ. हरीश शेट्टी व ९ जून रोजी डॉ. राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करणार आहेत. हेही वाचा: ‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ आणि ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ चित्रपट १४ जून रोजी सध्या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींमध्ये आमूलाग्र बदल घडून स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेतील ‘नव्या वाटा’ या सत्राअंतर्गत ‘युट्यूब - समाजमाध्यमे’ या विषयावर केतन जोशी, वित्तक्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी आणि एआय - कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत डॉ. भूषण केळकर मार्गदर्शन करणार आहेत. नवनवीन अभ्यासक्रम व विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींचा मागोवा विवेक वेलणकर घेतील. कौशल्य विकास आणि त्यामधील विविध संधींबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रतिनिधी पंकज तावडे मार्गदर्शन करणार आहेत. तर परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत बख्तावर कृष्णन व तरंग अग्रवाल संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना करिअर निवडीचा मंत्र देणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून ऑनलाइन व प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क हे अवघे ५० रुपये आहे. हेही वाचा : मुंबई: पश्चिम रेल्वेवरील रविवारचा ब्लाॅक रद्द तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधी कधी ?शनिवार, ८ जून आणि रविवार, ९ जून रोजीकुठे ?हॉटेल टीप टॉप प्लाझा, एल बी एस मार्ग, ठाणे (पश्चिम)केव्हा ?सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या ८ जून : जून : प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या प्रवेशिका ऑनलाइनसह प्रत्यक्ष पद्धतीनेही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ठाणे पश्चिमेकडील एल बी एस मार्गावरील हॉटेल टीप टॉप प्लाझा आणि नौपाडा येथील गोखले मार्गावरील जीन्स जंक्शन येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवेशिका उपलब्ध असतील. हेही वाचा : महा मेगा ब्लाॅकचा धसका; घरातून कार्यालयीन काम करण्यास कर्मचाऱ्यांची पसंती मुख्य प्रायोजक - आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडसहप्रायोजक - सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन्स अकॅडमी, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी,सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लीला एज्युकेशन सोसायटी आचार्य इन्स्टिट्यूशन्स, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणेबँकिंग पार्टनर - युनियन बँक ऑफ इंडियापॉवर्ड बाय - ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे , एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, भारत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कान्होर, बदलापूर (प.), विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, शौर्य डिफेन्स अकॅडमी, ठाणे, इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स