मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सूक्ष्म व लघुउद्योगांच्या निर्देशांकावरील कंपन्यांच्या बाजारमूल्याने ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. छोट्या उद्योगांना वाढीसाठी भांडवल उभारण्यासाठी सूक्ष्म व लघू निर्देशांकाचा पर्याय मिळण्याबरोबरच गुंतवणूकदारांनाही एक नवा मार्ग त्यानिमित्ताने खुला झाल्याचे चित्र आहे.

बीएसई एसएमईवर नुकतीच फॅबिनो लाइफ सायन्सेस ही ३६९वी कंपनी सूचिबद्ध झाली. आतापर्यंत या ३५९ सूक्ष्म व लघू कंपन्यांनी बीएसई एसएमईवरून ३७९६ कोटी रुपयांची भांडवल उभारणी केली असून १२७ कंपन्या प्रगती करत मुख्य निर्देशांकात समाविष्ट झाल्या आहेत. या ३५९ कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य आता ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेले आहे.

ED
‘व्हीआयपीएस’ कंपनीची २४ कोटींची मालमत्ता जप्त; पुण्यात ‘ईडी’ची कारवाई; संचालक दुबईत पसार
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…

छोट्या उद्योगांना भरारी घेण्याची आकांक्षा असते, परंतु वित्तीय संस्था त्यांना पुरेसे कर्ज देत नाहीत किंवा कर्जच देण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत आता बीएसई एसएमई हा देशातील हजारो छोट्या उद्योजकांसाठी भांडवल उभारणीचा खात्रीचा मार्ग वाटत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच या निर्देशांकातील कंपन्यांचे बाजारमूल्य ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचले हा यशाचा एक मोठा टप्पा आहे, असे बीएसई एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर यांनी सांगितले.