‘सुक्ष्म व लघुउद्योग बाजारमूल्य ५० हजार कोटींवर’

बीएसई एसएमईवर नुकतीच फॅबिनो लाइफ सायन्सेस ही ३६९वी कंपनी सूचिबद्ध झाली.

your-money2
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सूक्ष्म व लघुउद्योगांच्या निर्देशांकावरील कंपन्यांच्या बाजारमूल्याने ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. छोट्या उद्योगांना वाढीसाठी भांडवल उभारण्यासाठी सूक्ष्म व लघू निर्देशांकाचा पर्याय मिळण्याबरोबरच गुंतवणूकदारांनाही एक नवा मार्ग त्यानिमित्ताने खुला झाल्याचे चित्र आहे.

बीएसई एसएमईवर नुकतीच फॅबिनो लाइफ सायन्सेस ही ३६९वी कंपनी सूचिबद्ध झाली. आतापर्यंत या ३५९ सूक्ष्म व लघू कंपन्यांनी बीएसई एसएमईवरून ३७९६ कोटी रुपयांची भांडवल उभारणी केली असून १२७ कंपन्या प्रगती करत मुख्य निर्देशांकात समाविष्ट झाल्या आहेत. या ३५९ कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य आता ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेले आहे.

छोट्या उद्योगांना भरारी घेण्याची आकांक्षा असते, परंतु वित्तीय संस्था त्यांना पुरेसे कर्ज देत नाहीत किंवा कर्जच देण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत आता बीएसई एसएमई हा देशातील हजारो छोट्या उद्योजकांसाठी भांडवल उभारणीचा खात्रीचा मार्ग वाटत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच या निर्देशांकातील कंपन्यांचे बाजारमूल्य ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचले हा यशाचा एक मोठा टप्पा आहे, असे बीएसई एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Market value of micro and small enterprises over rs 50000 crore akp

Next Story
ओबीसींबरोबर मराठा समाजाचा तपशीलही गोळा करा; राज्य मागासवर्ग आयोगापुढे मागणी
फोटो गॅलरी