मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सूक्ष्म व लघुउद्योगांच्या निर्देशांकावरील कंपन्यांच्या बाजारमूल्याने ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. छोट्या उद्योगांना वाढीसाठी भांडवल उभारण्यासाठी सूक्ष्म व लघू निर्देशांकाचा पर्याय मिळण्याबरोबरच गुंतवणूकदारांनाही एक नवा मार्ग त्यानिमित्ताने खुला झाल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीएसई एसएमईवर नुकतीच फॅबिनो लाइफ सायन्सेस ही ३६९वी कंपनी सूचिबद्ध झाली. आतापर्यंत या ३५९ सूक्ष्म व लघू कंपन्यांनी बीएसई एसएमईवरून ३७९६ कोटी रुपयांची भांडवल उभारणी केली असून १२७ कंपन्या प्रगती करत मुख्य निर्देशांकात समाविष्ट झाल्या आहेत. या ३५९ कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य आता ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market value of micro and small enterprises over rs 50000 crore akp
First published on: 17-01-2022 at 01:20 IST