मुंबई : देशभरात करोना रुग्णांची काही प्रमाणात वाढलेल्या संख्येनंतर खबरदारी म्हणून रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी पुन्हा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार रेल्वे प्रवास करताना प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना यातून केल्या आहेत. मात्र प्रवाशांना ही मास्क सक्ती नाही, असे स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाने बुधवारी यासंदर्भात एक परिपत्रकच जारी केले आणि देशभरातील रेल्वेच्या सर्व विभागांना पाठवण्यात आले. स्थानकात वावरताना तसेच प्रवासात मास्कचा वापर प्रवाशांनी करावा, असे यात नमूद केले आहे. मध्य, पश्चिम रेल्वेकडून उद्घोषणांद्वारे प्रवाशांना मास्क घालण्याचे आवाहनही केले जाणार आहे. सध्या राज्यात मास्कसक्ती नाही.