पालघर येथील राहणारी आणि जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणारी सदिच्छा साने दोन वर्षापासून बेपत्ता होती. पण, तिचा खून केल्याचं समोर आलं आहे. जीवरक्षक मिथू सिंह याने सदिच्छाचा खून केल्याचं मिथू सिंह यानं कबूल केलं. तसेच, खूनानंतर मृतदेह समुद्रात फेकल्याचं मिथू सिंहने पोलीस चौकशीत सांगितलं आहे. आता याप्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे प्रकरण?

सदिच्छा ही जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली, ती परतलीच नाही. तिचा शोध लागत नसल्याने कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसेच, सदिच्छाचा शोध घेण्यासाठी बॅण्ड स्टॅण्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिची छायाचित्रे लावण्यात आली होती. जे. जे. मार्ग पोलिसांनीही तिचा शोध सुरू केला होता. मात्र ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.

हेही वाचा : धीरेंद्र महाराज-अंनिस वादात आता राम कदमांची उडी; म्हणाले, “स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे…”

तांत्रिक पुराव्यांवरून तिचे अखेरचे ठिकाण वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखा कक्ष ९ ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या वेळी तिला जीवरक्षक मिथू सिंह याने अखेर पाहिले होते. वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मिथू आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. चौकशीत सदिच्छाचा खून केल्याचं कबूल केलं. तसेच, तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याचेही सांगितले.

हेही वाचा : ”माझ्या कुटुंबाला आयएसआयकडून जीवे मारण्याची धमकी”, हिंदुस्थानी भाऊचा दावा; केली संरक्षण देण्याची मागणी!

खून करण्यापूर्वी मिथू सिंह सदिच्छाला भेटला होता

खून करण्यापूर्वी मिथू सिंह हा सदिच्छाला तीन वेळा भेटला होता. ऑक्टोंबर २०२१ मध्ये बॅण्ड स्टॅण्ड येथील एका हॉटेलमध्ये मिथू सिंह आणि सदिच्छा दोनवेळा भेटला. तिथे दोघांमध्ये गप्पाही झाल्या होत्या. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०२१ ला मिथू सिंह आणि सदिच्छा तिसऱ्यांदा भेटले. तेव्हा सदिच्छाने मिथू सिंहवर विश्वास ठेवत रात्री उशिरापर्यंत त्याच्याशी गप्पा मारल्या. तेव्हाच सिंह याने फायदा घेत सदिच्छावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांत बाचाबाची झाली. त्यातूनच सदिच्छाचा खून करण्यात आला, असा संशय गुन्हे शाखेला आहे. ‘मिड डे’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mbbs student sadichha sane meet mithu singh three times crime branch ssa
First published on: 22-01-2023 at 18:19 IST