मुंबई : शहरातील गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून बाधित आढळणाऱ्या अतिधोकादायक ठिकाणांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सुरुवातीला मुंबईच्या आठ प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला होता, मात्र आता ही संख्या ११ वर पोहोचली आहे. तसेच शुक्रवारी नवे आठ रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या २६०वर गेली आहे.

मुंबईतील गोवर रुग्णांचा आकडा ऑक्टोबरपासून वाढतच आहे. गोवरचा उद्रेक झालेल्या भागांची संख्या ११ झाली असून या विभागांमध्ये घरोघर जाऊन रुग्ण शोधण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. रुग्णांसाठी ३३० खाटा, अतिदक्षता विभाग, जीवन रक्षक प्रणाली आणि प्राणवायू पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे, असेही डॉ. गोमारे यांनी सांगितले.  मुंबईमध्ये ऑक्टोबरपासून गोवरचे रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला गोवंडी, चेंबूर, कुर्ला, मालाड, माटुंगा, भायखळा, दादर आणि सांताक्रूझ या भागांत गोवरचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात होते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या आठही प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. त्यानुसार प्रतिबंधासाठी नियमित, तसेच अतिरिक्त लसीकरणावर भर देण्यात आला. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये गोवरचा उद्रेक आणखी तीन प्रभागांमध्ये झाल्याचे निदर्शनास आले.

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

आठ नवे रुग्ण

मुंबईमध्ये शुक्रवारी गोवरचे आठ नवे रुग्ण आढळले असून, रुग्णांची संख्या २६० झाली आहे. तसेच १३६ संशयित रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या ३८३१ झाली आहे. सलग चार दिवसांपासून रोज एका रुग्णाचा गोवरमुळे मृत्यू होत असून शुक्रवारी शून्य मृत्यूची नोंद झाली. मृतांची संख्या १३ असून, दोन मृत्यू संशयित आहेत.

संवेदनशील भाग..

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी, चेंबूर, कुर्ला, मालाड, माटुंगा, भायखळा, दादर आणि सांताक्रूझ या आठ भागांबरोबरच आता भांडुप, प्रभादेवी आणि अंधेरी पूर्व या तीन प्रभागांमध्ये रुग्णसंखेत वाढ झाली आहे. प्रभादेवी आणि अंधेरी पूर्व या दोन भागांमध्ये तीन वेळा, तर भांडुपमध्ये दोन वेळा गोवरचा उद्रेक झाला.

लसीकरणावर भर..

रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई महापालिकेने गोवरग्रस्त भागांत मोठय़ा प्रमाणावर लसीकरणाला सुरुवात केली आहे. महापालिकेने आतापर्यंत लसीकरणाची नियमित ९६० तर अतिरिक्त १६७५ सत्रे भरवली आहेत.