मीरा बोरवणकर म्हणजे कडक शिस्त. संपूर्ण पोलीस दलात त्यांच्या नावाच दरारा आहे. कर्तव्यदक्ष आणि त्याचबरोबर प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. याच धाडसी महिला पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ हा कार्यक्रम २० नोव्हेंबरला आयोजित केला असून, बोरवणकर यांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात
आले आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत धडाडीने काम करणाऱ्या यशस्वी स्त्रियांना व्हिवा लाऊंजमध्ये निमंत्रित करण्यात येते. या वेळी प्रथमच व्हिवा लाऊंज पुण्यात होणार आहे. त्यानिमित्त पुण्याच्या आयुक्तपदी धडाडीने काम केलेल्या मीरा बोरवणकर पुणेकरांशी थेट संवाद साधतील.
बोरवणकर सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, तुरुंग प्रशासन या पदावर कार्यरत आहेत. एक महिला पोलीस अधिकारी एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही, तर करारी, धीट आणि कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.
कधी : २० नोव्हेंबर.
कुठे : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे.
वेळ : दुपारी ३.३०वाजता.

delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
dombivli, akhil bhartiya brahman mahasangh
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका