मिरारोडमध्ये हॉटेलच्या पाण्याच्या टाकीत आढळले दोन मृतदेह

दोघेही जण हॉटेलचेच कर्मचारी

मिरा रोड येथील एका हॉटेलच्या पाण्याच्या टाकीत दोन मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे दोन दोन्ही हॉटेलचे कर्मचारी असून यांची हत्या करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनएल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंट आहे. या हॉटेल मध्ये गुरुवारी मद्यरात्री दुहेरी हत्याकांड घडले असल्याचे समोर आले. सदर बारच्या मालकाने याची माहिती गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मीरारोड पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता टाकीत दोघांचे मृतदेह आढळून आले. नरेश पंडित (52) व हरेश शेट्टी (48) अशी हत्या झालेल्यांची कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोघेही बारचे कर्मचारी होते. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.दोन्ही मृतांच्या डोके व शरीरावर जखमा आढळल्या असून गुन्हा दाखल केला आहे. हत्या का व कोणी केली याचा पोलीस तपास करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Meera road hotel tow dead nck

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या