मध्य रेल्वे
* कुठे : भायखळा ते विद्याविहार यांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर
* कधी : स. ११.३० ते द. ३.३०.
* परिणाम : ब्लॉकदरम्यान भायखळा ते विद्याविहार यादरम्यान डाउन धिम्या मार्गावरील गाडय़ा डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाडय़ा परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर या गाडय़ा घाटकोपरजवळ पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाडय़ा चिंचपोकळी, करिरोड आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच अप जलद मार्गावरील गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबणार आहेत. तर डाउन जलद मार्गावरील गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्ग
* कुठे : कुर्ला ते वाशी यादरम्यान अप आणि डाउन मार्गावर
* कधी : स.११.३० ते दु.३.३०.
* परिणाम : ब्लॉकदरम्यान मुंबईहून वाशी, बेलापूर, पनवेल येथे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाडय़ा रद्द असतील. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल व बेलापूर येथून वाशीपर्यंत आणि मुंबईपासून कुल्र्यापर्यंत विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे
* कुठे : माहीम ते मुंबई सेंट्रल यांदरम्यान अप धिम्या मार्गावर
* कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
* परिणाम : ब्लॉकदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या सर्व धिम्या गाडय़ा माहीम ते मुंबई सेंट्रल यांदरम्यान अप जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा माटुंगा रोड, एल्फिन्स्टन रोड, लोअर परळ आणि महालक्ष्मी या स्थानकांवर थांबणार नाहीत. माहीम स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४वर थांबणाऱ्या सर्व १२ डब्यांच्या गाडय़ा दोनदा थांबवण्यात येतील.
मध्य, पश्चिम तसेच हार्बर मार्गावर ब्लॉकदरम्यान अनेक सेवा रद्द राहतील. तसेच सर्वच सेवा वेळापत्रकापेक्षा उशिराने धावणार आहेत. प्रवाशांनी जीव धोक्यात टाकून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.