विविध तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर, पनवेल- वाशी दोन्ही हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान, हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर सीएसएमटी-कल्याण, त्यापुढील लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची रविवारच्या मेगाब्लॉकमधून सुटका झाली आहे. शनिवारी रात्री साडे अकरा वाजल्यापासून चार तासांचा मेगाब्लॉक वसई ते भाईंदर दरम्यान घेण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई: पत्रा चाळ प्रकल्पासाठी म्हाडाकडून चार चटईक्षेत्रफळ!

accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
dombivli police marathi news, police died after falling from moving local train marathi news
कोपर रेल्वे स्थानकाजवळ पोलिसाचा लोकलमधून पडून मृत्यू
seven injured after machinery in trailer
मुंबई नाशिक महामार्गावर ट्रेलर मधील यंत्र वाहनांवर पडून सात जण जखमी

रविवारी माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ पर्यंत मुलुंड स्थानकापासून अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहे. या मार्गांवरील लोकल पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

हेही वाचा >>> मुंबई: नव्या वर्षात चार उपनगरीय स्थानकात सुविधांची रेलचेल

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. बेलापूर,नेरुळ-खारकोपर मात्र सुरळीत राहिल. पनवेल, बेलापूर ते सीएसएमटी दरम्यान दोन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बरवरील लोकल फेऱ्या सकाळी १० ते सायंकाळी चार पर्यंत रद्द राहतील. ठाणे-वाशी, नेरुळ फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध असतील.ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही. शनिवारी वसई-भाईंदर दरम्यान शनिवारी रात्री साडे अकरा ते रविवारी पहाटे सव्वा पाच वाजेपर्यंत दोन्ही जलद मार्गांवर ब्लॉक घेतला आहे. या दोन स्थानक दरम्यान जलद मार्गांवरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.