मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यांचा तपशील असा:

मध्य रेल्वे

कुठे – कल्याण ते ठाणे यादरम्यान अप जलद मार्गावर

कधी – स. ११.१० ते ३.४० वा.

परिणाम – ब्लॉकदरम्यान कल्याण ते ठाणे अप जलद गाडय़ा अप धीम्या मार्गावरून जातील. या गाडय़ा कल्याण ते ठाणेदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. नंतर मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा या स्थानकांवर थांबतील. सर्व गाडय़ा नियमित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने धावतील. या काळात रत्नागिरी-दादर या गाडीला दिवा स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

हार्बर मार्ग

कुठे – कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी – स. ११.३० ते ३.३० वा.

परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल, बेलापूरदरम्यान अप आणि डाऊन गाडय़ा रद्द असतील. सीएसटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष सेवा चालवण्यात येतील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्ग व मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची मुभाही देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे

कुठे – सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप धीम्या व डाउन जलद मार्गावर

कधी – स. १०.३५ ते ३.३५  वा.

परिणाम – डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा डाऊन धीम्या मार्गावरून जातील. अप धीम्या मार्गावरील गाडय़ा अप जलद मार्गावर जातील.  काही सेवा रद्द असतील.