मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे - कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावरील कुर्ला - वाशी अप आणि डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वेवर बोरिवली - जोगेश्वरी स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे. कुठे : ठाणे - कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल ठाणे - कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकात थांबतील. तर, कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल कल्याण - ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. हेही वाचा - माहीमधील ‘त्या’ बांधकामावरील कारवाईनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “धर्मांध मुस्लिमांनी…” कुठे : कुर्ला- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत परिणाम : हार्बर मार्गावरील सीएसएमटी येथून पनवेल / बेलापूर / वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल आणि वाशी / बेलापूर / पनवेल येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी / नेरुळ) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. हेही वाचा - जे.जे. रुग्णालयात लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया! २० कोटी खर्चाला तत्त्वत: मान्यता कुठे : बोरिवली - जोगेश्वरी स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर कधी : रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान परिणाम : ब्लाॅक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, या ब्लाॅकमुळे २५ मार्च रोजी अहमदबादहून सुटणारी गाडी क्रमांक १९४१८ अहमदाबाद - बोरिवली एक्स्प्रेस विरारपर्यंत चालवण्यात येईल.